Saturday, 19 October 2013

अगदी सोपी भरली वांगी- फोटोसह

from - http://www.maayboli.com/node/34682 

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

भरली वांगी करायची तर मसाला वाटणे वगैरे असते, कुठलेही वाटण न करता, हमखास कुणलाही
जमतील, अशी हि भरली वांगी.



लागणारे जिन्नस
१) पाव किलो वांगी, शक्यतो काळी गोल (मला आज लांबटच मिळाली.)
२) एक / दोन बटाटे
३) दोन मोठे कांदे
४) कपभर चिरलेली कोथिंबीर
५) २ टेबलस्पून दाण्याचे कूट
६) सुपारीएवढा गूळ (किंवा २ टिस्पून साखर)
७) १ टेबलस्पून लाल तिखट + आवडीचा कुठलाही मसाला (दोन्ही मिळून)
८) ३ टिस्पून तेल
९) २/३ वेलच्या आणि ४/६ मिरीदाणे
१०) मीठ, हळद, हिंग

क्रमवार पाककृती: 
१) वांग्याना व बटाट्याना x चिरा द्या, मी घेतलेली वांगी बारीकच होती, म्हणून मी एका बाजूनेच चिर दिलीय. व मीठाच्या पाण्यात टाका.
२) कांदे किसून एका वाडग्यात घ्या, कांद्याला सुटलेले पाणी वापरायचे आहे, म्हणून किसावेच लागतील. बारीक कापून चालत नाहीत. (या पदार्थातला एकमेव कौशल्याचा भाग )
३) त्यात मीठ, मसाले, गूळ, कोथिंबीर टाका व जरा वेळ बाजूला ठेवा.



४) वांगी पाण्यातून काढा, व मसाल्यात कूट मिसळून तो मसाला वांग्यात भरा. (वांगी गोल असतील तर
मसाला भरायच्या आधी वांग्याच्या बूडाशी कणभर मीठ घाला, असे केल्याने ती नीट शिजतात.बटाट्यातही मसाला भरा.



५) एक जाड बूडाचे भांडे घ्या व त्यात तळाशी अर्धे तेल टाका, त्यावर मिरी व वेलची अख्खीच टाका.
६) त्यावर वांगी व बटाटे रचा.
७) त्यावर उरलेला मसाला, सुटलेल्या पाण्यासकट टाका, वरुन अर्धे तेल टाका.
८) आता घट्ट झाकण ठेवून, भांड अगदी मंद आचेवर ठेवा.
९) या भाजीला सहसा वरुन पाणी घालावे लागत नाही, कांद्याच्या रसातच ती शिजतात, पण पुरेसे पाणी
सुटले नसेल तर थोडे पाणी शिंपडा.
१०) ५ मिनिटानी वांगी हलक्य हाताने परता व मसाला खालीवर करा.
११) ही भाजी शिजत असताना, मस्त वास सूटतो. बटाटे शिजले कि उतरवा.
वरणभात किंव भाकरीबरोबर खा. मला हि भाजी इतकी आवडते कि मी ती नुसतीच खातो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी

अधिक टिपा: 
आवडीप्रमाणे तेल मसाले वाढवू शकता, पण मला तेलकट आवडत नाही. फार मसालेही या प्रकारात
चांगले लागत नाहीत.


माहितीचा स्रोत: 
मी बरीच वर्षे हि भाजी करतो आहे, नक्की आठवत नाही, पण बहुतेक मंगला बर्वे यांच्या अन्नपूर्णा पुस्तकात वाचली असणार.       

from - http://www.maayboli.com/node/34682 

No comments:

Post a Comment